fbpx

भाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता थेट कारवाईचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. मोदी विरोधी चेहरे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी ममतांनी भरवलेल्या सभेला उपस्थिती लावली. मात्र यामध्ये शॉटगण म्हणून ओळखले जाणारे भाजप खा. शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा हे चर्चेचा विषय बनले आहेत.

मूळ भाजप खासदार असणारे सिन्हा केवळ सभेला उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी आपल्याच सरकार विरोधात हल्लाबोल देखील केला आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाने याची दखल घेतली असून लवकरच सिन्हा यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

मी भाजप खासदार असलो तरी जनतेच्या बाजूने आहे. त्यामुळेच स्व: पक्षाला आरसा दाखवण्याचे काम करत असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी स्पष्ट केले . तसेच सिन्हा यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व विरोधकांचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा हे संधिसाधू असून काही लोकांच्या इच्छा मोठ्या असतात असे म्हणत भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी सिन्हा यांच्यावर पक्ष लवकरच कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

3 Comments

Click here to post a comment