काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला धूळ चारत भाजपाचा दणदणीत विजय

फुलंब्री: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा मतदार संघ असलेल्या फुलंब्री नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने 17 पैकी आकरा जागा जिंकत विजय संपादन केला आहे.

तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला 17 पैकी 5 जागांवर विजय मिळवता आला असून एमआयएम ने 1 जागा मिळवली आहे. तसेच भाजपा पक्षाचे सुहास शिरसाठ यांची नगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.