भाजपच्या सत्तेमुळे देश लाजीरवाण्या परिस्थितीत – अरुंधती रॉय

टीम महाराष्ट्र देशा : ” भाजपाच्या हाती सत्ता आल्यापासून देशाचे केवळ आर्थिकच नाही, तर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तात्विक नुकसान झाले आहे. त्यामुळे देश सध्या लाजिरवाण्या परिस्थितीत असल्याचे सांगत ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी मंगळवारी (ता. १५) केंद्र सरकारवर सडकून टीका केली. जंतरमंतरवर आयोजित आंदोलनादरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.

तीन वर्षांपूर्वी जेएनयूमधून बेपत्ता झालेला नजीब अहमद नावाचा विद्यार्थी बेपत्ता झाला होता. दिल्ली पोलिसांसह सीबीआय आणि एनआयए या सरकारी संस्था अपयशी ठरल्या. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रॉय म्हणाल्या की, भाजपच्या काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. देशातील न्यायव्यवस्था, शिक्षण, पत्रकारिता, मानवाधिकार, संरक्षण या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे मत त्यांनी यावेळी मांडले.

त्याचप्रमाणे, हिंदुत्ववादी विचारसरणी पसरविण्यासाठी सर्व पातळ्यांवर नियंत्रण ठेवले जात आहे. मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ही बाब देशासाठी लाजीरवाणी आहे. अशा परिस्थितीत आपला देश महान ठरत नाही. संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला तर भारत पुन्हा महान ठरेल. पण सध्याची परिस्थिती भीषण आहे. पुढील काळात हे सरकार राष्ट्रीय नागरिकत्व कायदा लागू करू शकते, अशी शक्यताही रॉय यांनी व्यक्त केली.

जेएनयूएसयूच्या अध्यक्षा जैशे घोष म्हणाल्या की, वसतीगृहात घुसलेल्या टोळक्याने नजीबला बेदम मारहाण केली. सुरक्षा रक्षक असतानाही त्यांनी नजीबला वाचविण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. त्यानंतर नजीब बेपत्ता झाला. मात्र, आजपर्यंत नजीबचा शोध लागलेला नाही.पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनाहीत्याचा शोध लागला नाही त्यामुळे पुढील काळात गृह मंत्रालय, संसदेवर आम्ही मोर्चा नेणार आहोत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Loading...

 

Loading...

Loading...