भाजपला एकमार्गी विजय मिळणं हे मला पटत नाही- जयंत पाटील

मुंबई  – कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती होती. कुणीही आमच्या सागंली जिल्हयाच्या सीमेवर पलिकडे जो भाग आहे. तिथलं लोकं काही काँग्रेस पक्ष आणि तिथल्या सरकारवर निगेटिव्ह बोलत नव्हते. एकंदरीत वातावरण बघितलं तर काँग्रेसला चांगलं वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेसचा विजय होईल असं वाटत होतं. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत होता. मला आश्चर्य वाटतंय की, भाजपचा एकमार्गी विजय मिळणं हे मला पटत नाहीय. माझा विश्वास बसत नाहीय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक निवडणूक निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकमध्ये ग्राऊंड लेवलला माझा जास्त परिचय नाही परंतु मला जी माहिती मिळत होती. त्यावरुन काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे आणि आजचे निकाल पाहिले तर एवढया मोठयाप्रमाणात भाजप निवडून येणं आणि कमी प्रमाणात काँग्रेस निवडून येणं हे मिळत असलेल्या फिडबॅकशी सुसंगत नव्हते. ग्राऊंड रिअलिटीमध्ये लोकांच्या मनात होतं तेच फिडबॅकमध्ये येतं परंतु मला वाटत नाही तिथल्या लोकांच्या मनात जे होतं. त्यात आणि मतं पडली त्यात सुसंगती आहे अशी शंकाही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...