खडसेंच्या होमपीचवर भाजपची नव्याने पक्षबांधणी ; नवीन लोकांना संधी देणार

जळगाव : भाजपमधून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आता उत्तर महाराष्ट्रात भाजपचे काय होईल ? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जात होता. पण यावर स्थानिक भाजप नेत्यांनीच आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.एकनाथ खडसे यांच्या होमपिच असलेल्या मुक्ताईनगरमध्येच भाजपची पक्षबांधणीसाठी गुरुवारी बैठक झाली.

या बैठकीला गिरीश महाजन मुंबईला गेल्यामुळे अनुपस्थित होते.पण तरीही एकमुखाने निर्णय घेण्यात आला की ‘गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली आता काम करायचे आणि तरुणांना पक्षात आवर्जून स्थान द्यायचे.

या बैठकीत भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे आदी मान्यवर यांसह ४० – ५० कार्यकर्ते उपस्थित होते.

पण तरीही या बैठकीला बहुतांश कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. भाजपसाठी पुढील वाटचाल अवघड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या