जळगावात भाजपची मुसंडी,सत्तास्थापनेकडे भाजपची वाटचाल

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : जळगावात भाजपने मुसंडी मारली असून,सत्तास्थापनेकडे भाजपची वाटचाल सुरु आहे,शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगावमध्ये भाजप तब्बल ५७ जागांवर आघाडीवर आहे. जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.

दुसऱ्या बाजूला मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज निकाल लागणार आहे. प्रभाग क्रमांक- 6 राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.नर्गिस सय्यद, मेनुद्दीन बागवान, रजिया काजी, अथहर नायकवडी विजयी झाले तर अपक्ष आल्लू काजी यांनी अथहर नायकवडी यांना दिली कडवी लढत, अवघ्या 96 मतांनी काजी पराभूत झाले.

सांगली निवडणूक निकाल हाती येत असून प्रभाग 15 चा निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेस 3 तर राष्ट्रवादी 1 जागी विजयी झाले आहेत.मतमोजणीला सुरुवात झाली असून दोन्ही महापालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवारांचा आज फैसला लागणार आहे. सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठापणाला लागलीये.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 62 टक्के तर जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी अंदाजे 55 टक्के मतदान झालंय. सांगलीत 11 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप सह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलीये.

Jalgaon, Sangli Election Results Live : जळगावात भाजपाची आघाडी

सांगली :अपक्ष आल्लू काजी अवघ्या 96 मतांनी पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

LIVE

  • जळगाव निवडणूक निकाल : 75 जागांचे कल हाती, भाजप 57 जागांवर पुढे तर शिवसेना 14 आणि इतर 4 जागी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक- 6 राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विजयीझाले आहेत.नर्गिस सय्यद, मेनुद्दीन बागवान, रजिया काजी, अथहर नायकवडी विजयी झाले तर अपक्ष आल्लू काजी यांनी अथहर नायकवडी यांना दिली कडवी लढत, अवघ्या 96 मतांनी काजी पराभूत झाले.
  • जळगाव प्रभाग क्रमांक 15 अ व ब मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आघाडीवर
  • जळगावमध्ये भाजप 8 तर शिवसेना 4 जागी आघाडीवर
  • जळगाव : प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचे सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे हे चारही उमेदवार आघाडीवर
  • सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर आघाडी
  • सांगली निवडणूक निकाल : पहिला कल हाती, काँग्रेसला 3 तर भाजपला एका जागेवर आघाडी
  • सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 जागा
  • #सांगली – पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिले कल काही क्षणात हाती