मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या सर्व पाश्वर्भूमीवर आता निखिल वागळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.
ठाकरे सरकारची अवस्था अत्यंत डगमगीत स्थितीसारखी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सेनेला जशी गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदारांचा गट तयार झाला असल्याची चर्चा आहे. तर आता सेनेकडे फक्त १५ आमदारांचा पाठींबा आणि साथ आहे. यावरूनच भाजपकडून सतत शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. या पाश्वर्भूमीवर निखिल वागळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “एकनाथ शिंदेंचा वापर करुन शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. पण शिवसेना तात्पुरती जखमी होईल पण संपणार नाही”, अशी प्रतिक्रिया निखिल वागळे यांनी दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला रामराम ठोकला आहे. तर शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आसाममध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –