भाजपने अल्पसंख्याकांना झुलवत ठेवले; एकनाथ खडसेंनी दिला घरचा आहेर

khadse-vs-fadnavis

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. अल्पसंख्याकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही. हे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. यांच्या मनात अल्पसंख्याकांसाठी काय भावना आहेत हे ओळखू येत आहे. उगाच त्यांना आशेवर ठेवायचं बंद करा, असा इशारा खडसे यांनी भाजपला सरकारला दिला.

भाजप सरकार राज्यातील अल्पसंख्याकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकडे आताचे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. तसेच त्यांना आश्वासन देऊन झुलवत ठेवत आहे. असे बोलत एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांवर हल्ला चढवला.

एकनाथ खडसे म्हणाले, अल्पसंख्याक विभागाच्या संदर्भात गेले तीन वर्षांपूर्वी पहिले पॉलिटेक्निक विद्यालय माझ्या मतदारसंघात सुरू केले. जागा दिली, टेंडर काढले. मात्र. निधीची तरतूद नाही. त्यामुळे हे विद्यालय होऊ शकलेले नाही. त्यांना शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. मात्र किती विद्यार्थ्यांना दिली ? १० टक्के विद्यार्थ्यांनाही ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी खडसे यांनी यावेळी केली.

अल्पसंख्याकांचे काम होणार आहे की नाही ते सभागृहात सांगा. उगाच त्यांना आशेवर ठेवायचे का? स्पष्ट सांगितले तर ते आशेने पाहणार तर नाहीत. या विभागाच्या निधीसाठी सर्वत्र फिरलो. मात्र त्यांना निधी मिळालेला नाही, अशी खंत खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली.