भाजप युवामोर्चा अध्यक्षाची मनपा अभियंत्यास मारहाण

इतवारा पोलीस ठाण्यात  एफआयआर दाखल

नांदेड: भाजप युवामोर्चाचे महानगर अध्यक्ष दिलीपसिंघ सोढी यांनी मनपाचे उपअभियंते संदीप पाटील यांना मारहाण केली आहे. त्यामुळे सोढी यांना हे प्रकरण चांगलच महागात पडलं आहे.

दिलीपसिंघ सोढी यांच्या पत्नी गुरप्रितकौर सोढी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि जिल्हा न्यायालयात हे प्रकरण सोपवावे, असा ठराव महानगरपालिकेत एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे.

आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात  एफआयआर दाखल करण्यात आला असून, सोढी यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या ३५३,३४१,३३२,५०४ आणि ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय दिलीपसिंघ सोढी यांना अटकही करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

दिलीपसिंघ सोढी यांनी शुक्रवारी जुन्या पुलाजवळील शनी मंदिराजवळ उपअभियंते संदीप पाटील यांना बोलावून घेतले आणि त्यांना जबर मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर सोढी यांनी या मारहाणीची चित्रफितही केली. ही चित्रफित व्हायरल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आणि त्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे आजची मनपाची सर्वसाधारण सभा फक्त निषेधाचा ठराव करुन तहकूब करण्यात आली.

दिलीपसिंघ सोढी,भाजप युवामोर्चाचे महानगर अध्यक्ष

dilip singh sodhi

You might also like
Comments
Loading...