भाजपच्या महाजनादेश यात्रेत उस्मानाबाद जिल्हयात होणार राजकीय भुकंप ?

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते भाजपच्या गळला लागल्याचे दिसत आहे. उस्मानाबादचे बडे प्रस्थ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावान नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं सांगितल जात आहे. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज उस्मानाबाद येथे आली होती. यावेळी यात्रेच्या बँनरवरुन जिल्हयातील राजकिय ताकदवान असलेल्या पाटील पितापुत्रांचे फोटो हटवण्यात आले होते. यावरून मतदारसंघातून पाटील पिता – पुत्र भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचं सांगितल जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भाजपाच्या महाजनादेश यात्रेत राजकिय भुकंप होणार असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान आ. राणा पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र याला अजूनही आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही. तर कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून आ. राणाजगजितसिंहपाटील यांनी भाजपा प्रवेशाबाबत चाचणी केली आहे. या बैठकांमध्ये कार्यकत्यांचा भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.