भाजपचे लोकप्रतिनिधी एका महिन्याचे वेतन ‘भाजप आपदा कोष’मध्ये जमा करणार

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे  लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. आता अश्या गरीब गरजू व्यक्तींसाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी आपले एक महिन्याचे वेतन कोरोनासाठी मदत म्हणून देणार आहे. आमदार आपले वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत तर खासदार आपले एक महिन्याचं वेतन पंतप्रधान सहायता निधीत जमा करणार आहेत अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

तर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार आपले एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार आपले एका महिन्याचे वेतन भाजप आपदा कोषमध्ये जमा करणार आहे. कोरोनोचा सामना करताना जनसामान्यांना मदत करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येईल. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे.

‘कोरोनोचा सामना करताना जनसामान्यांना मदत करण्यासाठी  @BJP4Maharashtra च्या सर्व खासदार, आमदारांनी एक महिन्याचे वेतन भाजपा आपदा कोषमध्ये जमा करण्याचा आज सर्वानुमते निर्णय झाला.यासंदर्भात पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधून सर्वांना सुचना दिल्या.’