Jalgaon, Sangli Election Results Live : जळगावात भाजपाची आघाडी

टीम महाराष्ट्र देशा : जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून दोन्ही महापालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवारांचा आज फैसला लागणार आहे. सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठापणाला लागलीये.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 62 टक्के तर जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी अंदाजे 55 टक्के मतदान झालंय. सांगलीत 11 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप सह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलीये.

LIVE : सांगलीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

LIVE

  • जळगाव प्रभाग क्रमांक 15 अ व ब मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आघाडीवर
  • जळगावमध्ये भाजप 8 तर शिवसेना 4 जागी आघाडीवर
  • जळगाव : प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचे सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे हे चारही उमेदवार आघाडीवर
  • जळगाव : अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नसल्याने मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांची निदर्शनं
  • सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर आघाडी
  • सांगली निवडणूक निकाल : पहिला कल हाती, काँग्रेसला 3 तर भाजपला एका जागेवर आघाडी
  • सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 जागा
  • #सांगली – पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिले कल काही क्षणात हाती