लातूर : कोरोना संसर्ग काळात महावितरणने अनेक ग्राहकांना अवाजवी वीजबिले दिली आहेत. त्या वीज बिलांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि वीजबिल थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडण्याचे सुरू असलेले प्रकार तात्काळ थांबवावेत यासारख्या अनेक मागण्यासाठी लातूरात बुधवारी जेलभरो आंदोलन करणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितली.
कोरोना काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीजबिल माफी देऊ असे पहिले आश्वासन दिले. मात्र कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर हेच महाविकास आघाडी सरकारने वीजबिल वसुली सुरू केली. या कारवाईत महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई देखील केली आहे. यासारख्या अनेक मागण्यासाठी भाजप तर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व हे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड आणि इतर पदाधिकारी करतील
शेतकऱ्यांना थकीत बील भरण्यासाठी कृषी संजीवनी योजना सुरू आहे, असे असतानाही थकबाकी असल्यामुळे वीज पुरवठा तोडण्याचे प्रकार सुरू आहे, हे तत्काळ थांबवावेत. तसेच साखर कारखान्यांनी त्वरीत एफआरपी प्रमाणे ऊसाची बिले द्यावीत, लॉकडाऊन काळात दिलेल्या अवाजवी वीज बिलांची तात्काळ दुरूस्ती करावी. यासह विविध प्रश्नावर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजपाचे सर्व पदाधिकारी, वीज ग्राहक, शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- कोरोनाचा उद्रेक, घाटीत गेल्या २४ तासात एकालाही डिस्चार्ज नाही
- खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूने खळबळ ; कोण होते खासदार मोहन डेलकर ?
- पेट्रोलचे नवे भाव, २५ ला पाव!
- जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही ? : करुणा मुंडे