विधानसभा निवडणूक आणि आगामी ‘इनकमिंग’ वर दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपमध्ये आता निवडणुकांची खलबतं सुरू झाली आहेत. दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपचे जवळपास सर्वच मंत्री दिल्लीत या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपमध्ये येत असलेल्या आमदारांच्या पक्षप्रवेश कधी होणार याची निश्चितीही या बैठकीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांनी कृषी मंत्रीपद दिले जाऊ शकते. मंत्रिमंडळातील होणाऱ्या खांदेपालटावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

तर, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्षपदाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत. यामुळे त्यांचे हे पद आता रिकामे आहे. हे पद कोणाला मिळणार याची चर्चाही या बैठकीत होणार आहेत.Loading…
Loading...