fbpx

गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपचे सर्वाधिक उमेदवार

bjp flag

बंगळुरू: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सर्वाधिक उमेदवार भाजपचे असल्याचे ‘एडीआर’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘एडीआर’ ने मेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

भाजपच्या २२४ उमेदवारांमध्ये ८३ जणांवर अनेक गंभीर गुन्हे आणि खटले दाखल आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचा नंबर लागतो. २२० उमेदवारांमध्ये ५९ जणांवर गुन्हेगारी खटले आहेत. तसेच जनता दल १९९ उमेदवारांमध्ये ४१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. २०१३ मध्ये ३३४ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. या निवडणुकीत ही संख्या ३९१वर पोहचली आहे.

कर्नाटकमध्ये २५६० उमेदवारांपैकी ३९१ जणांनी गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे जाहीर केले आहे. दोषी आढळल्यास पाच वर्षे शिक्षा आणि निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले भाजपचे तब्बल ५८ उमेदवार आहेत.