भाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी निवडणूक होत आहे. यामध्ये एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलने नाराजी व्यक्त केली आहे. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading...

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हरीवंश यांच्या नावावर सहमतीसाठी अकाली दलचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्याशी स्वतः चर्चा केली. अकाली दल निवडणुकीत अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अकाली दलने एनडीएची साथ न देण्याची ही पहिलीच वेळ असेल.

कर्नाटक विधानसभा : कोणाला पाठींबा द्यायचा ते निकालानंतर ठरवू – एच. डी. देवेगौडा

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...