भाजपचा ‘हा’ नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान

टीम महाराष्ट्र देशा: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यातील बऱ्याच विषयांवर बैठका घेत आहेत.यावेळी भाजपनेते आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा पुण्यात येऊन त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. प्रसाद लाड आणि अजित पवार यांची सर्किट हाऊस इथं भेट झाली. या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली.प्रसाद लाड यांनी अजित पवारांची भेट नेमकी का घेतली, याबाबतचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

भाजपचा एक बडा नेता पुन्हा एकदा अजित पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर थोड्याशा थांबलेल्या भेटीगाठी पुन्हा सुरु झाल्या की काय असा प्रश्न पडणारं चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

Loading...

या भेटीनंतर बाहेर आलेल्या प्रसाद लाड यांना माध्यमांनी भेटीबाबत विचारलं असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.अजित पवार आणि भाजप नेत्यांची भेट हा राजकीय वर्तुळातील नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भल्या पहाटे शपथ झाल्यानंतर, राजकीय वर्तुळात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर संजय दौंड यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी अजित पवारांनी भाजप नेत्यांना आवाहन केलं होत त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यामुळे या भेटीमागे कारण काय हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात