लातूर काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपची खेळी, जिल्हा बँक निवडणुकीत उतरवले पॅनल

लातूर काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपची खेळी, जिल्हा बँक निवडणुकीत उतरवले पॅनल

Rameshappa Karad

लातूर : जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा लातूर जिल्हा बँकेची निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, सहकार महर्षी म्हणून घेणाऱ्यांनी कायमच शेतकऱ्यांना दूर ठेवले आहे, या वेळी त्यांनी तसे करू नये, असा इशाराही भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

विलासराव देशमुख असताना कायमच या बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्या नंतरही दिलीपराव देशमुख यांनी या बँकेची निवडणूक बिनविरोध करुन घेतली होती. मात्र, यंदा त्यांच्यासमोर भाजपच्या वतीने सक्षम उमेदवार देण्यात आले असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड यांनी केला आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लातूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमीका राहिली आहे. नफ्यामध्ये असलेल्या या बँकेवर कायमच देशमुख यांचे वर्चस्व राहिले आहे. यंदा मात्र, देशमुख यांच्या वर्चस्वाला भाजपने आव्हान दिले आहे. या संदर्भात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील लातूरमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या