महाराष्ट्रातही भाजपचे  मित्रपक्ष बंडाच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात भाजपचे मित्रपक्ष साथ सोडत असताना आता महाराष्ट्रातही त्याचे पडसात पडत आहेत. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी भाजपची साथ सोडणार असल्याचे सांगितले आहे. बीड मधील  स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. त्यासोबत आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

यावेळी बोलताना मेटे म्हणाले, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन खारीचा वाटा उचलला. मात्र, स्थानिक नेत्यांनी विरोधी राष्ट्रवादीला मदत करुन शिवसंग्रामला सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपचा पाठींबा काढण्याची त्यांनी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मेटे म्हणाले कि  शिवसंग्राम साडेचार वर्षांपासून महायुतीत आहे. इतर सर्व पक्षांना लोकसभेच्या जागा दिल्या. परंतु शिवसंग्रामला लोकसभेची जागाही दिली नाही व विधानसभेच्याही कमी दिल्या. देशातील राजकीय वातावरण भाजपच्या विरोधात जात असताना अजूनही काही मित्रपक्ष सोडतील अशी शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...