fbpx

भाजपचा पटर्न हा लाटेवरचा पटर्न आहे ; पुणेरी पाटीतून शिवसेनेची खरमरीत टीका

टीम महाराष्ट्र देशा : पुणेकर म्हणजे काहीतरी हटके करणारे, प्रेमळ भाषेत शालजोडे मारण्याची कला पुणेकरांना चांगलीच अवगत आहे . पुणेरी पाट्यातून हेच पहायला मिळते. काही दिवसांपासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना उपदेश देणारे,शालजोडे मारणारे पोस्टर पुण्यात लागू लागले आहेत.नुकतेच पाणी प्रश्नावरून गिरीश बापटांविरोधात पुण्यात पोस्टर लागले होते,आता पुन्हा पुण्यातील धायरीतही रस्त्याच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना टोमणे मारणारे पोस्टर लावले आहेत.

‘२०१९ उजाडलं तरी प्रगती नाय’ असा संतप्त सवाल धायरीतील शिवसेना नेते महेश पोकळे यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना केला आहे.त्यापुढे त्यांनी भाजपचा पटर्न हा कामे रेंगाळत ठेवणारा असून लाटेवरचा पटर्न आहे, अशी खरमरीत टीका पोस्टरच्या माध्यमातून पोकळे यांनी भाजप नगरसेवक, आणि आमदारावर केली आहे.

धायरीतील कित्तेक दिवसांपासून रखडलेल्या कामामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या कामासाठी आलेल्या निधीतून झालेले फुटपाथचे कामही निकृष्ठ दर्जाचे केले आहे . या कारणानेच आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष केले जात आहे.धायरीतील रस्त्यांवर शिवसेनेने ‘बा धारेश्वरा’ आम्ही रस्त्याची काम करत नाय तर… रेंगाळत ठेवतो …कारण आमचा पटर्न लाटेवरचा पटर्न.’तर दुसऱ्या पोस्टरमध्ये त्यांनी ‘बा धारेश्वरा’ कासवाची गती काय असते माहित आहे..? असं प्रश्न विचारात पुढे ‘धायरीच्या रस्त्याची कामे बघा लगेच कळेल कासवगती. अशा आशयाचे उपरोधिकपणे शालजोडे मारणारे पोस्टर्स धायरीत दिसत आहेत.