मुंबई : एकीकडे विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. एकीकडे विधान परिषद निवडणुकीच्या जागांसाठी मतदान सुरु असताना अशा ऐन निवडणुकीच्या काळात भेट घेण्यामागील कारण मात्र त्यांनी दुसरेच सांगितले. नागपूरच्या कामानिमित्त आम्ही अजित पवार यांना भेटल्याचे सांगत त्यांनी मुख्य विषयाला बगल दिली. मात्र यावेळी त्यांनी सूचकपणे काही गोष्टींवर बोट ठेवले.
माझा एक लाख टक्के दावा आहे, आजच्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भाजपाचाच जास्तीचा उमेदवार निवडून येईल. भाजपाचा पाचवा उमेदवार इतरांपेक्षा ही जास्त मताधिक्याने निवडून येईल, असा खळबळजनक दावा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केला आहे. आज ते अजित पवार यांना भेटल्यानंतर त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अशा महाविकास आघाडीत समाविष्ट असलेले प्रमुख पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार दिलेले आहेत. तर भाजपाकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. तर भाजपाने आपल्या मतदान कोट्यापेक्षा एक जास्तीचा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होत आहे.
मतदान सुरू असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्चर्यकारकपणे अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एकनाथ खडसेदेखील उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावले आहेत. सरकार वाचवण्यासाठी शिवसेना आपल्या मावळ्याचा बळी देण्याच्या तयारीत आहे, असे विधान भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. त्यानंतर बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :