Share

Chandrashekhar Bawankule | बारामती नंतर आता एकनाथ शिंदेच्या ठाण्यावर भाजपचा डोळा, चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार तयारी

Chandrashekhar Bawankule | मुंबई : भाजप (BJP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यातच भाजप पक्षाने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाण्यात विविध बैठका घेणार आहेत. पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या बाईक रॅलीत सहभागी होणार आहे. ही बाईक रॅली सिंघानिया शाळेपासून सुरू झाली.

यादरम्यान, आज बाईक रॅली झाल्यानंतर संध्याकाळी भाजपने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार असून ते कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याच्या टिप्स देणार आहेत. त्यापूर्वी बाईक रॅलीनंतर बावनकुळे आज दिवसभर ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | मुंबई : भाजप (BJP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now