भाजपा बाँड्रीवर असणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारी अखेरला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी जिल्हयातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपात चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यासंदर्भात विचारल्यानंतर पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजप चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवेल. विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील. असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

You might also like
Comments
Loading...