पुद्दुचेरीतील सरकार गमावलेल्या कॉंग्रेससाठी गुजरातमधूनही आली वाईट बातमी

rahul gandhi

नवी दिल्ली- मागील अनेक दिवसांपासून देशातील राजकीय चर्चेमधील मुद्दा असणाऱ्या पुद्दुचेरीत आज काँग्रेसचे सरकार पडले. पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार आज बहुत सिद्ध न करु शकल्याने पडलं. रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं नाही.

या आघातामधून कॉंग्रेसमधून सावरते न सावरते तोच  कॉंग्रेससाठी गुजरातमधूनही वाईट बातमी आली आहे.गुजरात राज्यसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. दिनेश अन्वडिया आणि राम मोकरिया हे दोन्ही उमेदवार विजयी घोषित झाले.दरम्यान, यात कॉंग्रेसने एक जागा गमावली आहे.

भाजपचे दोन डमी उमेदवार रजनीकांत पटेल आणि कीर्ती सोलंकी यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचवेळी कॉंग्रेसने कोणताही उमेदवार उभा केला नाही.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपचे अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणुका होणार होत्या. अहमद पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ऑगस्ट 2023 पर्यंत होता आणि भारद्वाज यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत होता.

गुजरातच्या 182 सदस्यांच्या विधानसभेत भाजपकडे 111 सदस्य आहेत, तर कॉंग्रेसकडे 65 आमदार आहेत. दरम्यान,कॉंग्रेसला एकही जागा जिंकण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे कॉंग्रेसने आपले कोणतेही उमेदवार उभे केले नाहीत.

महत्वाच्या बातम्या