भाजपच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द

shripad chindam

नगर: नगर महापिकेतील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला आहे. सदर प्रकरणाची व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

दैनिक ‘सामना’ ने दिलेल्या वृत्तानुसार नगर महापालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांबद्दल घाणेरड्या भाषेचा वापर केला आहे. छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून श्रीपाद छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. त्यामुळे सत्तेत आणि उपमहापौर पदावर असलेल्या छिंदान यांना राग अनावर झाला. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व शिवजयंतीबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरली. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केली असून गंभीर दखल घेतली आहे.