‘देशाला विभागण्यासाठी भाजपकडून ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती’ : अशोक गेहलोत 

ashok gehlot

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.

भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाला विभागण्यासाठीच ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती करण्यात आलीय. यामागे देशातील सांप्रदायिक सद्भावनेला हानी पोहोचवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे.

देशातील सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याचा, सामाजिक तणाव वाढ करणं आणि संविधानिक प्रावधानांचं उल्लंघन करण्याचा भाजपचा कट दिसतोय. त्यासाठीच ‘लक्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान , केरळ उच्च न्यायालयानं राज्यात लव्ह जिहादचं कोणतंही प्रकरण नसल्याचं  म्हटलं होतं. याबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. आता त्यावर गृह मंत्रालयानं लिखित स्वरुपात उत्तर दिलं होत. लव्ह जिहादबद्दल गृह मंत्रालयानं लोकसभेत लिखित स्वरुपात दाखल केलेल्या उत्तरात सध्याच्या कायद्यांचा उल्लेख आहे.

‘लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नाही. तसेच केंद्रीय यंत्रणांकडेही लव्ह जिहादशी संबंधित कोणतीही माहिती नाही. केरळमध्ये दोन आंतरजातीय विवाहाची प्रकरणं समोर आली होती. याची चौकशी एनआयएकडून करण्यात आली होती,’ असंही गृह मंत्रालयानं या उत्तरात म्हटलं होत.

महत्वाच्या बातम्या