भाजपला सत्तेची लालसा, सत्तेसाठी घेतायतं खोट्याचा सहारा : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्ता संघर्षाचे सत्र अद्याप सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या टिकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपने केलेले आरोप खोडून काढले आहेत.

ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी वाटली. आम्ही बरोबर नसतो तर भाजपला अचाट विकास करता आला असता का ? हा आमचा प्रश्न आहे. आम्ही जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले. सरकारमध्ये असताना न्याय मिळवून देत आलो. जनतेचा शिवसेनच्या शब्दावर विश्वास आहे. माझ्यावर आणि शिवसेनेवर पहिल्यांदा खोटारडेपणाचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटारडेपणाचे आरोप केले आहेत. हा शिवसेनेचा अपमान आहे. उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी भाजप अध्यक्ष तयार झाले होते. आम्ही उपमुख्यमंत्री पदासाठी लाचार झालो नाही. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली. लोकसभेवेळी झालेल्या चर्चेत आम्ही समसमान वाटपाचा मुद्दा मांडला. त्यावेळी समसमान वाटपाचा मुद्दा तर त्यांनी मान्य केला. भाजपने गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस हे आमचे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली आहे. मला मान्य आहे. पण तुम्ही शब्द पाळला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेतले प्रमुख मुद्दे

 • खोट बोलण्याचा त्यांनी हिशोब मांडला तर नोटाबंदीच्या आश्वासना बाबत कोण खोट बोललं हे जनता जाणून आहे.
 • आम्ही मोदींवर टीका केली नाही.
 • खाते वाटपा बाबत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली.
 • भाजपला सत्तेची लालसा आहे.
 • चुकीच्या माणसांबरोबर युती केली.
 • भाजपला शत्रू मानत नाही, पण ते खोटे बोलत आहेत.
 • उद्धव ठाकरेंनी जुने व्हिडीओ दाखवत केली पोलखोल.
 • RSS बाबत आम्हाला आदर आहे.बहुमत नसताना भाजपच सरकार कसं येणार ?
 • आम्ही खोटारड्यांशी बोलणार नाही.
 • शिवसेना तोंडावर बोलते.
 • कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत कोणतीही चर्चा केली नाही.
 • शिवसेनेचाचं मुख्यमंत्री करणार.