‘त्या’ ग्रामपंचायती ताब्यात असल्याचा भाजपचा दावा खोटा

bjp-shivsena

उस्मानाबाद: तालुक्यातील 41 ग्रामपंचायत ताब्यात असल्याचा भाजपचा दावा हास्यास्पद असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिश सोमाणी यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे. मुळात अनेक तालुक्यात भारतीय जनता पक्षाला साधा उमेदवारही मिळालेला नाही. याप्रकारचे खोटे दावे करून भाजप स्वत: चे हसे करून घेत आहे, असे सोमाणी यांनी म्हणाले आहे.

तालुक्यात एकूण चार ग्रामपंचायत बिनविरोध निवडूण आल्या तर अनेक गावात भाजपला साधा उमेदवारही मिळाला नसल्याचा दावा सोमाणी यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यात ते म्हणतात की भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था ही केवीलवाणी आहे. पण त्यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तालुक्यात एक, दोन नव्हे तर 41 ग्रामपंचायत ताब्यात असल्याचा दावा अंत्यत चुकिचा व दिशाहीन आहे. हा दावा म्हणजे बौद्धीक व वैचारिक दिवाळखोरी आहे असा टोला सोमाणी यांनी मारला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ते सक्रिय नव्हते. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ताब्यात बहुसंख्य ग्रामपंचायत असल्याचा दावा सोमाणी  यांनी केला आहे. पण शुक्रवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत तालुक्यात 53 ग्रामपंचायत महिला साठी राखीव म्हणुण जाहिर झाल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी बहुमत असुनही सरपंचपदी विरोधी पक्षाची वर्णी लागली आहे.

महत्वाच्या बातम्या