भाजपच्या बिलंदर लोकांनी सदाभाऊंना शेतकरी संघटनेतून फोडले- अजित पवार

उंब्रज: राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आज उंब्रज येथे बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपेने शेतकरी संघटना फोडली असल्याचा आरोप केला.

अजित पवार म्हणाले, भाजपच्या बिलंदर लोकांनी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांना फोडून मंत्रीपद दिले. तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. मंत्री बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांना वेदना देतात. हे शहरी मुखवटे असलेले सरकार आहे. या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवणे गरजेचे आहे. असे आवाहन अजित पवार यांनी उपस्थित नागरिकांना केले.