टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले. त्याचे नेतृत्व सुद्धा ओबीसीने केले आहे.राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी समाजातील एका व्यक्तीचा समावेश राम मंदिर ट्रस्टमध्ये करायला हवा होता. राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, विनय कटियार आणि आपल्यासह रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी नेत्यांनी केले आहे. परंतु, सरकारने राजकीय व्यक्तीला ट्रस्टमध्ये घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी राजकारणाबाहेरील एखाद्या ओबीसी व्यक्तीला ट्रस्टमध्ये स्थान द्यायला हवे होते, अशी इच्छा पुढे भारती यांनी व्यक्त केली.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या सदस्य आणि अध्यक्षपदावरून भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आधी अध्यक्षपदावर नाराजी होती. आता सदस्यपदावरून उमा भारती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही पहा :