‘१ रुपयात आरोग्य तपासणीचं काय झाल? शिवभोजन थाळीचं काय झाल? नाईट लाईफचं काय झाल?

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात लॉक डाऊन जाहीर केलं. त्यानंतर देशातील कोरोना फैलावाची स्थिती बघता केंद्र सरकारनेही देशभरात लॉक डाऊन जाहीर केलं आहे. आता हे लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत असेल.

लॉक डाऊन झाल्याने सामान्य लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात समाजातील गरीब वर्ग ज्याचं हातावर पोट आहे याला सर्वाधिक झळ बसत आहे. रोजंदारी करून कमावून खाणाऱ्या या वर्गाचा पैसे कमावण्याचा मार्गच बंद झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच देशातील गरीब आणि चांगल्या निवाऱ्याची सोय नसणाऱ्या वर्गासमोर आरोग्याचाही प्रश्न आहे.

आता महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी राज्यातील सत्ताधारी शिवेसेनेवर यावरून निशाणा साधला आहे. शिवसेनेने २०१९च्या विधानसभा निवडणूकीत १ रुपयात आरोग्य तपासणी तसेच १० रुपयात जेवण थाळीचं आश्वासन दिलं होत त्याच आता काय झालं असं या काळात विचारणं योग्य नाही असा टोलाही लगावला आहे.

आपल्या ट्वीटरवर अवधूत वाघ म्हणाले,  ‘कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमधे, एक रुपयात आरोग्य तपासणी च काय झाल? शिवभोजन थाळीच काय झाल? नाईट लाईफ च काय झाल? असे प्रश्न ऊपस्थित करणे योग्य नाही. राजकारण टाळा.’

हेही पहा –