माधुरीने भाजपची खासदारपदाची ऑफर नाकारली 

मुंबई : भाजपकडून राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर मिळाली असल्याची कबुली माधुरी दीक्षितने दिली आहे. मात्र आपण सध्या तरी राजकारणात जाणार नसल्यानं भाजपकडून देण्यात आलेली खासदारकीची ऑफर स्वीकारण्याचा प्रश्नच  नसल्याचं माधुरीने म्हंटलं आहे.

नुकतंच तिच्या बकेट लिस्टच्या यशाबद्दल तीने काही माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना तीने भाजपकडून राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर मिळाली असल्याचा खुलासा केला. खुद्द अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिची भेट घेतल्यानंतर तर तिच्या राजकारण प्रवेशाबद्दलच्या चर्चा  रंगू लागल्या होत्या. मात्र आपण राजकारणात जाणार नसल्याचं सांगतं माधुरीने या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.