भाजपा समाजात फूट पाडत असल्याचा भाजप खासदाराचाच आरोप, खासदार पदाचा राजीनामा

 टिम महाराष्ट्र देशा : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चित भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज भाजपाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील बहराईच मतदारसंघाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भाजपा समाजात फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना केला.
यापूर्वीही त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुनही त्यांनी आपल्याच पक्षाला घेरले होते. मी भाजपाची नव्हे तर दलिताची मुलगी आहे. आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. मी जर खासदार झाले नसते तर भाजपाला बहराईच मतदारसंघ राखता आला नसता. असा असा टोला खासदार सावित्रीबाई फुले यांनी आपल्याच पक्षाला लावला होता.