भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले राठोडांच्या ताफ्याला काळे झेंडे

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. मात्र, आज प्रतीक्षा संपली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.

‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे. संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावरून त्यांच्यावर भाजपने घणाघात केला आहे. पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना त्यांच्या ताफ्याला भाजप युवा मोर्चाच्या  पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत राठोडविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भाजप युवा मोर्चाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. संजय राठोड पोहरादेवीचे दर्शन घेऊन यवतमाळमध्ये दाखल होताच त्यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.

महत्त्वाच्या बातम्या