मेहबूब शेख यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने भाजप युवा मोर्चाने पुण्यात केली पोस्टरबाजी!

पुणे:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी भाजपकडून राज्यभर तीव्र निदर्शनं केली गेली होती.

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. याबाबतची माहिती tv9 मराठी या वहिनीने प्रकाशित केली होती. ही तरुणी नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता.

अलीकडच्या काही दिवसांत औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तरुणीने तक्रारीत म्हटले होते की, 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला. तरुणीने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आता मेहबूब शेखवर पंधरा दिवस उलटून पण कारवाई होत नसल्याने पुण्यातील भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यातील विविध भागात मेहबूब शेख यांच्याविरुद्ध भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मेहबूब शेख यांच्याविरोधात कारवाई कधी होणार?, महाविकास आघाडी सरकार बलात्कार्यांच्या पाठीशी?, गुन्हेगारांना सरकारचे अभय? अशा पद्धतीचा मजकूर पोस्टवर लिहून पुण्यातील भाजप युवा मोर्चाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP