‘गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला,आता तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही होत आहे’

टीम महाराष्ट्र देशा– भाजपच्या  नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असण्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा मुंडे या भाजपचा नवा गट तयार करण्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.  गोपीनाथ गडावर येत्या 12 तारखेला जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याचंही बोललं जातंय.तसेच महाराष्ट्रात अडगळीत पडलेला मुंडे गट पुन्हा सक्रीय होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

दरम्यान, ‘भाजपने कायम ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपने मांडला होता, तो आम्ही फेटाळून लावला होता,’ असं म्हणत धनगर समाजातील नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगत होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी ओबीसी नेते असलेल्या प्रकाश शेंडगे यांच्या आरोपाची चर्चा होत आहे.

‘पंकजा मुंडे भाजपच्या निशाण्यावर आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला. आता तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही होत आहे. पंकजा यांना भाजप नेत्यांनीच मतदारसंघात पराभूत केले. आण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे , दौलत आहेर यांसारखे नेते भाजपने संपवले. पंकजा यांनी वेळीच योग्य निर्णय घ्यावा,’ असा सल्लाही प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांच्या परळीतील पराभवाला अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या :

Loading...