भाजप कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ

जळगाव: जळगावात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर एका कार्यकर्त्याने माजी मंत्री आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून पदाधिकयांच्या वाहनांकडे दगड भिरकावल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे़. यासंदर्भातील एक आशऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे़ मात्र, ही व्यक्ती मनोरुग्ण असून ती व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे़.

पोलिसांनी या प्रकारानंतर सदर ठिकाणी पाहणी केली होती़. भाजपच्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़.बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच हा कार्यकर्ता दरवाजातच त्यांच्यासमोर लोळत होता.

मात्र, तो मनोरुग्ण असल्याचे सांगत काही अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले़ त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला व काही वेळानंतर ते परतले मात्र, या दरम्यान, विजय नामक या कार्यकर्त्याने गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगडफेकल्याची माहित एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे़. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती़.पोलीस भाजप कार्यालयात जावून आले होते़ मात्र, याबाबत कुठलाही गुन्हा दाखल किंवा नोंद करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या