भाजपचा कार्यकर्ता तुरुंगातून पळाला

औरंगाबाद (बिहार): भाजपचा कार्यकर्ता तुरुंगातून पळून गेला आहे. श्रीरामनवमीला बिहार मध्ये दंगेखोरांनी हौदोस घातला होता. यामुळे दोन समाजात प्रचंड तणाव निर्माण केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दीडशेहून अधिक जणांना याप्रकणी अटक केली आहे. त्यामध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असून भाजपचा कार्यकर्ता पळून गेल्याचे वृत्त आहे.

रामनवमीच्या दिवशी बिहारच्या औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यामुळे याचप्रकरणात भाजप कार्यकर्ता अनिल सिंह याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र गुरुवारी तो तुरुंगातून पळून गेला. भाजपचा कार्यकर्ता पळून गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि जेडीयूवर टीका केली आहे.