पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांचे ‘साम-दाम-दंड’ विजयी; शिवसेनेचा पराभव

पालघर: भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात एकमेकांची चिरफाड केल्याचं पहायला मिळाल. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. तर शिवसेनेचे चिंतामण वणगा यांना लीड तोडण्यात अपयश आले आहे.

You might also like
Comments
Loading...