मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय निश्चित मानला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं. मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी रविवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य केली होती. तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.
राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजपा नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. यामध्ये भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील आणि अपक्ष म्हणूनही लढणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुक न लढवण्यासाठी राज ठाकरेंचे भाजपला आवाहन
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली होती. यावर चर्चा करून निर्णय देऊ असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं होत. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
शरद पवारांचेही अंधेरी पूर्व पोटनिवडणुक न लढवण्यासाठी आवाहन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्हीही उमेदवार दिला नव्हता त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको असं म्हणत पवारांनी सर्वपक्षीय आवाहन केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “मी तर फक्त ट्रेलर आहे, चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरु होतो”, देवेंद्र फडणवीसांची फटाकेबाजी
- Uddhav Thackeray | “उद्धवसाहेब काळजी नसावी…”; ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना शब्द
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार, पीएम किसान योजनेचा 12 हफ्ता आज होणार जमा
- Narayan Rane | “विनायक राऊत यांना पाडण्यासाठी…”, शहाजीबापू पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया
- Shivsena । “गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे”; ठाकरे गटाचा इशारा
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका