भाजपला शुभेच्छा, राणे जातात त्या पक्षाची विल्हेवाट लावतात : उद्धव ठाकरे

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. ते कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत होते. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राणे जिथे जातील तिथे वाट लावतात. आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली.

कणकवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना हे युतीतील दोन्ही मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपने नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना तर शिवसेनेने राणेंची साथ सोडून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी नितेश यांच्या प्रचारासाठी व नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवलीत सभा झाल्यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेऊन राणे पितापुत्रांच्या भाजप प्रवेशाचा समाचार घेतला. ‘

‘मुख्यमंत्री काल येऊन गेले… तुमचा आमचा लढा नाही, दुष्मनी नाही… पण काही गोष्टी सांगाव्या लागतात, मित्राला सावध करावे लागते’ असं म्हणत त्यांनी भाजपाला सावधानतेचा इशारा दिला. ‘राणेंनी काँग्रेस सोडली तेव्हा मला प्रतिक्रिया विचारली गेली… मी म्हटलं सोनिया गांधी आणि काँग्रेसला शुभेच्छा… तशा आज मी भाजपाला शुभेच्छा देतो… हे अनुभवाचे बोल आहेत’ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता त्याच्याही प्रचाराला आम्ही आलो असतो. जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी यांना हाकलले म्हणून शिवसेना मोठी झाली, त्यानंतर हे काँग्रेसमध्ये गेले मग स्वतःचा पक्ष काढला आता भाजपामध्ये गेले. मी भाजपाला शुभेच्छा देतो.

महत्वाच्या बातम्या