गोव्यात भाजपचेच सरकार, भाजपने जिंकला विश्वासदर्शक ठराव

pramod sawant goa cm

टीम महाराष्ट्र देशा: मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यामध्ये कॉंग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. मात्र भाजपने अपक्ष आणि इतर पक्षांची जमवाजमव करत गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यामध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील इतर पक्षांना जवळ करत प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लावली.

दरम्यान, सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. यामध्ये भाजपला २१ तर कॉंग्रेसला १५ मते मिळाली. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले आहे.