महायुती 250 चा आकडा गाठणारचं : चंद्रकांत पाटील

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी महायुती 250 चा आकडा गाठणारचं असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पत्रकारांनी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘2014 पासूनचा मतदारांचा कल आजही दिसून येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारदर्शक सरकार दिलं आहे. मोदींमुळे मतदानावरचा, राजकारणाचा आणि राजकारण्यांवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘मी सकाळी सात वाजल्यापासून कोथरुड मतदारसंघात फिरत आहे. लोकांमध्ये प्रंचड उत्साह आहे. लोकांच्या देहबोलीवरुन जो कल लक्षात येतोय तो महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे, असे म्हणाले.

दरम्यान, सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.

महत्वाच्या बातम्या