fbpx

आम्हाला काँग्रेस आमदारांचा पाठींबा; विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकणार – येडियुरप्पा

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार असून, हा विश्वासदर्शक ठराव अम्हींच जिंकणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलतं होते.

ते पुढे बोलताना म्हणाले आमची बैठक नुकतीच पार पडली. आमच्याकडे बहुमताचा आकडा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप आनंदात आहेत. १०१ टक्के आम्हीच फ्लोअर टेस्ट जिंकणार आहोत काँग्रेस, जेडीएसचे आमदार संपर्कात आहेत का? असे विचारले असता त्यांनी, होय अर्थातच काँग्रेस आणि जेडिएसचे काही आमदार आमच्या सोबत येत आहेत त्याचमुळे आम्ही फ्लोअर टेस्ट जिंकणार आहोत आणि सरकार आमचेच राहणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.