‘माढा असो अथवा बारामती दोन्ही ठिकाणी कमळचं फुलणार’

अकलूज – सोलापुरच्या जनतेमुळे शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत आहे. ओपनिंगला आलेले पवारसाहेब १२ वा खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतले. माढा असो अथवा बारामती येथे कमळ फुलणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे देखील मंचावर उपस्थित आहेत, त्यामुळे विजयदादांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती, मात्र विजयदादांनी भाजप प्रवेश न करता भाजपला सहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर आज त्यांनी अकलूजमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर उपस्थित लावली आहे.

दरम्यान, शरद पवार कुटुंबीयांवर साधा ओरखडाही उमटू देत नाहीत, गर्दी पाहूनच समजलं त्यांनी माढ्याचं मैदान का सोडलं. वेळेपूर्वीच वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्या शरद पवारांनी मैदानातून पळ का काढला असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

फडणवीस आणि मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

  • पंढरीचा विठुराया, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सिद्धेश्वर महाराज आणि अहिल्याबाई होळकरांच्या भूमीला प्रणाम, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
  •   महाराष्ट्राची अखंड सेवा करणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटलांना पंचाहत्तरीनिमित्त वंदन : नरेंद्र मोद
  •  शरद पवार कुटुंबीयांवर साधा ओरखडाही उमटू देत नाहीत, गर्दी पाहूनच समजलं त्यांनी माढ्याचं मैदान का सोडलं : नरेंद्र मोदी
  •  काँग्रेस-राष्ट्रवादीची महामिलावट कधीच देशाला मजबूत सरकार देऊ शकत नाही : नरेंद्र मोदी
  •  वेळेपूर्वीच वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्या शरद पवारांनी मैदानातून पळ का काढला? : नरेंद्र मोदी
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या सरकारने न्याय दिला, जाणते राजे कृषिमंत्री असून काही केलं नाही : मुख्यमंत्री
  • सातारा-सांगलीतील दुष्काळी भागाला पाणी मिळणार : मुख्यमंत्री