राहुल गांधीनी कितीही आकांड-तांडव केला तरी गुजरातमध्ये विजय भाजपचाच-आठवले

central ministerRamdas Athawale

पुणे – सध्या राहुल गांधी हे केंद्र सरकारवर जीएसटी तसेच नोट बंदीच्या मुद्यावरून टीका करत आहेत मात्र राहुल गांधीनी कितीही आकांड-तांडव केला तरी गुजरातमध्ये विजय भाजपचाच होणार असल्याचं भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे .पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी भाजप हा फक्त ब्राह्मणांचा पक्ष राहिला नसून आता बहुजनांचा पक्ष झाला असल्याचा देखील दावा आठवले यांनी केला आहे.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जीएसटी तसेच नोट बंदीच्या मुद्यावरून हल्ले चढवत आहेत .भाजपने देखील गुजरात जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. दलितांची निर्णायक मते भाजपच्या बाजूने असल्याने गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असून असल्याच मत व्यक्त करताना रामदास आठवले यांनी कॉंग्रेसला चांगलच धारेवर धरलं.राहुल गांधी यांनी सत्ता असताना देशाचा विकास का केला नाही असा सवाल उपस्थित केला तसेच गुजरातमध्ये रिपाई निवडणुका लढवणार नसून भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत करणार असल्याच देखील आठवले यांनी स्पष्ट केलं . दर १० वर्षांनी नोट बंदी करावी अशी सूचना बाबासाहेबांनीच केली असल्यामुळे मोदींनी केलेल्या नोट बंदीच समर्थन आठवले यांनी केलं तर जीएसटीला संसदेत मान्यता सर्व पक्षांनी दिली मग आता विरोध कशासाठी असं म्हणत कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण असल्याची टीका आठवले यांनी केली