fbpx

भाजपा लोकसभेच्या 23 जागा जिंकणारचं, शाहांनी बंगालमध्ये व्यक्त केला विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये दौरे करून जनतेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाहसुद्धा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी जनसभेला संबोधित करताना अमित शाहांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपा लोकसभेच्या 23 जागा जिंकणारचं असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच ममता बॅनर्जीं ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट होत आहे. असे देखील टोला ममता बॅनर्जींना शाहांनी लगावला आहे.

यावेळी शहा म्हणाले की, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगाल मध्ये ४२ जागांपैकी २३ जागांवर विजय संपादन करणार आहे. तसेच ममता बॅनर्जीं यांच्या कार्यपद्धतीमुळे प.बंगालची संस्कृती लोप पावत चालली आहे. असे देखील शाह यावेळी म्हणाले.

दरम्यान भाजप आणि ममता बॅनर्जी यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे भाजप नेते आणि ममता बॅनर्जी यांच्यात अनेकदा शाब्दिक झुंज पाहायला मिळते. याआधी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना प. बंगाल मधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते.