फडणवीसांची चाणाक्ष खेळी ; राणेंसह एकनाथ खडसे सुद्धा राज्यसभेवर ?

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून राज्यसभेसाठी नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, शनिवारी भाजपाकडून एक अनपेक्षित नाव पुढे आले. सूत्रांच्या माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या आरोपामुळे सध्या मंत्रिमंडळातून बाहेर असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याविषयी भाजपच्या गोटात जोरदार खलबते सुरू आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना थेट दिल्लीत पाठवण्याची चाणाक्ष खेळी खेळल्याची शक्यता आहे. जेणेकरून खडसे यांना न्याय दिल्याचेही भासवता येईल आणि दुसरीकडे राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून त्यांना दूरही ठेवता येईल. मात्र, एकनाथ खडसे यांना हा प्रस्ताव कितपत मान्य होईल, याबाबत शंकाच आहे.