fbpx

निकालानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष बदलणार, ‘या’ नावाची चर्चा

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईतील राजकारणात मोठ्या हालचाली घडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांच्या अध्यक्षपदाच्या २ टर्म झाल्यामुळे त्यांची पुन्हा अध्यक्ष पदावर निवड होणारनाही.  भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा मुंबई भाजपच्या अध्यक्ष पदासाठी होत आहे.

भाजपच्या घटनेनुसार कोणत्याही व्यक्तीला अध्यक्षपदावर २ टर्म पेक्षा जास्त काळ राहता येत नाही. आणि शेलार यांच्या दुसऱ्या टर्मची मुदत जून महिन्यात संपत असल्याने आशिष शेलार यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची माळ मनोज कोटक यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत मनोज कोटक

मनोज कोटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनोज कोटक सध्याचे बीएमसीतले भाजपचे गटनेते आहेत. त्याचबरोबर ते भाजपचे ईशान्य मुंबईतले लोकसभा उमेदवारही आहेत. या जागेवर किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली.