भाजपच्या जागा कमी होणार- आठवले

शिवसेनेची उडवली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा- आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मात्र तरीही अडीचशे जागा मिळवून केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे वतीने आज (गुरुवारी) पिंपरीत सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विभागाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले  रामदास आठवले?

दलित मते भाजपकडे वळली असून 2019 च्या निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजप सोबत आहे २०१९च्या निवडणुकीची तयारी सुरू असून ती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आणि या निवडणुका जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. थोड्याशा जागा कमी होतील, हे आम्ही मान्य करू. गुजरातमध्ये भाजपाला ११५-१६ जागा मिळतील असे वाटले होते. मात्र, ९९ जागांवर समाधान मानावे लागले, असे देखील ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपाला अडीचशेच्या पुढे जागा मिळतील, मात्र काही राज्यात फटका बसेल अनेक राज्यात भाजपाचे सरकार आलेले आहे. पण थोडा चढ-उतार राजकारणात असतो.

शिवसेनेची उडवली खिल्ली

महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा, सेना आणि आरपीआयने एकत्रित राहावे हा माझा प्रयत्न आहे. शिवसेनेलासोबत ठेवणे गरजेचे आहे. त्यांची काही नाराजी असेल तर दूर करावी. केंद्रात शिवसेनेचा मंत्री करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे २०१९ मध्ये स्वबळावर लढणार असा प्रश्न केला असता, उद्धव ठाकरे यांनी सांगितले असले तरी राजकारणात असेच असते असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

 

You might also like
Comments
Loading...